शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे – दादा भुसे

भरपाई

शेतकऱ्यांचे पाणी बंद करण्यात आलेले नाही कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेट देत त्यांच्या शेती विषयक समस्या तसेच नवीन शेती तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

यावेळी त्यांनी सांगितले की जलयुक्त शिवार योजनेवर सावध पवित्रा घेऊन बोलताना ही योजना पूर्वी काळापासूनच सुरू असून केवळ सरकार बदलल्याने पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेचे नाव बदलून जलयुक्त शिवार योजना असा केल्याचा खुलासा राज्यमंत्र्यांनी दिलाय. शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीसाठी पाणी शासनाकडून बंद करण्यात आलं नसल्याचे स्पष्टीकरण ही दादा भुसे यांनी दिलेय.

गरज भासल्यास नियमाच्या चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार – दादाजी भुसे

शेतकऱ्यांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्राम विकास संकल्पना योजनेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवारांना विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती ही 80 टक्के कोरडवाहू तर 20 टक्के पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन धोरण राबविण्यात येणार असून बियाणे तसेच विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यापासून कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल हे सर्व बाळासाहेब ठाकरे कृषी व ग्राम विकास संकल्पना या योजनेला जास्तच जास्त निधी मिळावा अशी मागणी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी अजित पवारांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – दादा भुसे

‘पोकरा’च्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया करणार सुलभ – दादा भुसे