मुंबई – राज्यात गेल्या २४ तासात ६,४७९ नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण सांख्या ६३,१०,१९४ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासात रोजी एकूण ७८,९६२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्याचं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९६ टक्क्यांच्या वर गेलं आहे. राज्यातील मृत्यूंच्या संख्येत देखील गेल्या २४ तासात घट झाली आहे. शनिवारी २२५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी १५७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात एकूण ६०,९४,८९६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५९ % एवढं झालं आहे. राज्यात गेल्या २४ तासात १५७ करोना बाधधत रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुनयाांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.
दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणू आढळलेली ही पहिलाच रुग्ण आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम
- जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्यासाठी कडक उपाययोजना
- पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी आता कठोर निर्णयाची गरज – उद्धव ठाकरे
- निर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल – छगन भुजबळ
- दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?