सोलापूर – राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने ) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९७ साखर कारखान्यांकडून ७४८.८५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ७५५.१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०८ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७७.७६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १६१.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब
- कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत – नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू
- आज कुठे पाऊस पडणार? हवामान विभागानं वर्तवला ‘हा’ अंदाज