राज्यात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

पाऊस

मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. राज्यात सध्या विविध भागात पाउसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेकाना पाऊसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र नुकतेच आता हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे.

तर राज्यात मुंबईसह ठाण्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

तर, राज्यात मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांसह कोकणवासियांना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः ची काळजी घेत आपल्या कामाचे नियोजन करायला हवे. तसेच यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –