पुणे – बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर मोठा बदल झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस राहणार असून मेघगर्नजेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
गुजरात आणि मध्य प्रदेशातून माघार घेतलेल्या परतीच्या पावसासाठी राज्यातूनही माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती तयार होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. यातच उत्तर कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव रविवारी (११ ऑक्टोबर) कमी होऊन ते उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. तसेच रायलसीमा आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीदरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.
दरम्यान, अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुके पडत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात चढउतार होत आहे. त्यातच दिवसभर पडत असलेल्या उन्हामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी ‘या’ काही सोप्या टीप्स, जाणून घ्या
- बॅंकेच्या खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असले तरीही बॅंकेतून काढू शकता ५ हजार रूपये, जाणून घ्या
- मोठी बातमी – नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट
- भारतामध्ये 5.48 लाख लोकांना रोजगार देणार ‘ही’ कंपनी