राज्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पाऊस

मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार मराठवाड्यामध्ये गुरुवार ते रविवार (दि. 1८ ते 21)  मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस होेईल. काही ठिकाणी गारपीटही होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्तीत सर्व यंत्रणा व नागरिकांनी सर्वेत्तपरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

वीजांचा कडकडाट होत असताना फोनचा वापर टाळावा 

वीजाचा कडकडाट होत असताना फोनचा वापर करू नये, शॉवरखाली आंघोळ करू नये, बेसीनचे नळ, पाईपलाईन यांना स्पर्श करू नये, विजेच्या साहित्याचा वापर करू नये, लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेवू नये, उंच झाडाच्या खाली थांबू नये, धातूच्या उंच मनोऱ्या  जवळ थांबू नये, वीजा पडतांना पाहू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी बजावल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचे आवाहन 

कोरानाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तर या वेळी मोठ्या प्रमाणात एकत्र जमु नये. मास्क वापरावा, आरोग्याची काळजी देखील घ्यावी. काही त्रास झाल्यास जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जावून वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –