राज्याने एक दुग्धोत्पादक क्षेत्रातील संशोधक गमावला – सुनिल केदार

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार

काकासाहेब चितळे यांच्या निधनाने एक दुग्धोत्पादक क्षेत्रातील संशोधक गमावला अशा शब्दांत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

श्री.केदार आपल्या शोक संदेशात पुढे म्हणाले, चितळे डेअरी म्हटलं की, श्रीखंड आणि बाकरवडी हे दोन पदार्थ समोर येतातच. पुण्यात चितळे डेअरीची अनेक उत्पादनं प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्येही चितळे डेअरीजचे पदार्थ मिळतात. दुधाच्या व्यवसायापासून सुरु झालेल्या व्यवसायाची व्याप्ती  काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांनी चांगलीच वाढवली.

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय

चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. या डेअरीची स्थापना भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली. त्यांच्यानंतर काकासाहेब चितळे आणि नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली.

काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल, तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला.आज ते आपल्या सर्वांमधून गेले आहे, मी त्यांना‍ विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असेही श्री.केदार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

पानी फाऊंडेशन’च्या उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उद्धव ठाकरे

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई