लसीकरणात राज्याने केली विक्रमी नोंद: आतापर्यंत १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कोरोना

मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. काल महाराष्ट्राने एकाच दिवसात पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले होते. त्यामुळे देशात एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरणाचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर झाला आहे. आता एकूण लसीकरणातही महाराष्ट्राने विक्रम केला आहे. आतापर्यंत राज्यात १.५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून इतर राज्यांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वात जास्त आहे.

लसीकरणाच्या बाबतीत सुरूवातीपासूनच महाराष्ट्र आघाडीवर आहे. कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेले लसीकरण थांबलेले नाही. सोमवारी सकाळ पर्यंत राज्यातील १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले होते. त्यात दिवसभरात विक्रमी लसीकरणाची भर पडली. यामुळे हा आकडा सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या वर गेला होता. यात आता मंगळवारी सकाळी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच लसीकरण झालेल्या नागरिकांचा आकडा १.५ कोटी पर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा लसीकरणावर जोर देत असून त्यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे. या विक्रमाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून आभार मानले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरणाला दुसरा पर्याय नाही. त्यात आता महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या –