राज्यात आज पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस

पाऊस

मुंबई – राज्यात मागील काही दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. तर राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी काल हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. तर राज्यात येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असे विभागाकडून हवामान सांगण्यात आले आहे.

तर हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर रेड अलर्टमध्ये राज्यातील ७ जिल्ह्यांचा समावेश आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे. यामध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

आज २२ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

तर उद्या २३ जुलै रोजी सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, चंद्रपूर सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच यवतमाळ, वाशिम आणि वर्धा जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –