पुढेचे चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज

पाऊस

मुंबई : सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर आहे. तसेच आता गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. मात्र यामध्ये देखील पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढेचे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने बरसण्यास सुरुवात केली होती. तर आता पुढील काही दिवस देखील राज्यातील काहीं भागात हा पाऊस असाच राहणार आहे.

हवामान विभागाकडून कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. जिल्ह्याचा विचार करता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १३ आणि १४ सप्टेंबरला गोवा, कोकण याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना देखील सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –