स्टॅच्यू ऑफ युनिटीला पहिल्याच पावसाने झोडपले, ३ हजार कोटी पाण्यात

स्टॅच्यू ऑफ युनिटी

महाराष्ट्रासह गुजरात मध्ये देखील पावसाने जोरदार सुरवात केली आहे. त्यामुळे गुजरातकर देखील पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. असे असले तरी गुजरात प्रशासनाचे मात्र धाबे दणाणले आहेत. कारण गुजरातमध्ये सुरु झालेल्या सुरवातीच्याच पावसाने जगातील सर्वात उंच असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला झोडपले आहे. कारण पुतळ्याच्या १५० मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पावसाचं पाणी साचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच हा पुतळा आहे. प्रेक्षकांना उंचावरुन नर्मदा नदीवरील धरण पाहता यावं यासाठी ही गॅलरी बनविण्यात आली होती. मात्र पहिल्या पावसात असा फटका बसल्याने गॅलरीत पाणी साचले आहे. मात्र आता या गॅलरीत पाणी भरल्याने चिंता व्यक्त केली जातेय. व्यवस्थापन टीमकडून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे.

दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी भारत सरकारने २.९८९ कोटींचा खर्च केले आहेत. मात्र पहिल्या पावसात अशी अवस्था झाल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ