रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम

कोरोना

नवी दिल्ली – देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी असून त्यावरून असे सूचित होते की देशभरात 10  पैकी केवळ 1 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहेत .सध्या देशात एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ 9.29 टक्केच सक्रिय रुग्ण असून ही संख्या 7,15,812 इतकी आहे.

आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवताना, रोजचा रुग्ण आढळण्याचा दरही गेले तीन दिवस  5% पेक्षा कमी कायम राहिला आहे. यावरून असे दिसून येते की केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या केंद्रित धोरणे आणि कृतीद्वारे संसर्गाचा प्रसार प्रभावीपणे रोखणे शक्य झाले आहे. आज, दैनंदिन सकारात्मकता दर 3.8% नोंदला गेला आहे. रोजच्या सकारात्मक दरातील घट आणि एकूण सक्रिय रुग्णांची घटती संख्या यांची तुलना केली जाते. सक्रिय रुग्णांची संख्या 7.5 लाखाच्या (7,15,812) खाली आहेभारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 69 लाखाजवळ (68,74,518) पोहचली आहे.

सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यांच्यातील अंतर सातत्याने वाढत असून ते आज 61,58,706 इतके आहे.गेल्या 24  तासांत,79,415  रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर 55,839.नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बरे होण्यासंदर्भातला राष्ट्रीय दर वाढून  89.20% वर गेला आहे. बरे झालेल्यांपैकी 81% व्यक्ति10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील आहेत.एकाच दिवसात बरे झालेल्यांच्या संख्येत महाराष्ट्राचे 23,000 हून अधिक योगदान आहे. गेल्या 24 तासात 55,839  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ;78 % रुग्ण  10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्र आणि केरळमध्ये अद्याप नवीन रुग्णांची संख्या मोठी असून महाराष्ट्रात 8,000 हून अधिक तर कर्नाटकात 5,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जवळपास 82% दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत.25 % पेक्षा जास्त नवीन मृत्यू महाराष्ट्रातील आहेत (180 मृत्यू). महाराष्ट्रात बुधवारी 8,142 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली, तर 23,371 रुग्ण या आजारातून बरे झाले. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 1.58 लाख इतकी झाली आहे. मुंबईत 1,609 नवीन रुग्ण आढळले असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 19,245 इतकी झाली आहे. तथापि, प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पोस्ट कोविड केअर सेंटर’ सुरू करणारा नागपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या –