साधासुधा नाही हा तर महाघोटाळा; घोटाळा करताना मृत शेतकऱ्यालाही सोडलं नाही!

farmers

परभणी-  सदाशिव सातपुते या शेतकऱ्याने २७ मार्च २०१४ रोजी कर्जासाठी अर्ज केल्याची नोंद बँकेत आहे. परंतु सातपुते यांचे कर्जाच्या अर्जाच्या तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते त्यांनी अर्ज कसा केला असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यानंतर त्यांना १,८३,६९० रुपये आंध्रा बँकेकडून मिळाले. मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला एका कथित फसवणूकीचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर सदाशिव सातपुते यांचे हे प्रकरण उघडकीस आले.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने जून 2019 मध्ये बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात रत्नाकर गुट्टे यांच्या मालमत्तांसह 10 ठिकाणी छापे टाकले. २०१२-२०१३ आणि  २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने सात बँकांकडून ५७८ कोटी रुपयांचे फसवे कर्ज घेतले. यामध्ये २४००० हजार हुन अधिक शेतकऱ्यांच्या नावांवर फसवे कर्ज कारखानाने उचले आहे.  ज्यांच्या नावाने हे कर्ज घेतले गेले, त्यांचे आधीच निधन झाले आहे. निधन झाल्यानंतर शेतकऱ्याने अर्ज कसा केला असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रत्नाकर गुट्टे मार्च २०१९ पासून  पैशाच्या घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात आहेत. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करीत आहे.

गेल्या २०१९ जूनमध्ये छापे टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की जीएसईएलने ( GSEL) कंपनीने दिलेल्या हमीच्या आधारे हजारो शेतकऱ्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांकडून फसव्या पद्धतीने कर्ज घेतले. येथे जिवंत असतानी रीतसर अर्ज करूनही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत, परंतु या प्रकरणात शेतकऱ्याच्या निधनानंतर त्याच्या नावावर कर्ज घेतले गेले. सातपुते यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या नावावर अस्या फसव्या कर्जाची नोंद आहे.

‘ठिबक’ अनुदानाचा अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

डिसेंबर २०१८ मध्ये ६५ वर्षीय सुलोचना तळे यांना बँकेची नोटीस आली. बँकेने २,९०, ५४३ रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पतीकडे या विषयी विचरणी केली असता, त्यांना हे काय आहे याचा पत्तासुद्धा नव्हता. त्यांच्या वकिलांनी नोटिसला उत्तर दिले असून हे प्रकरण न्यायालयात आहे. शेतकरी तळे यांनी काही वर्षांपूर्वी गुट्टे यांच्या कारखान्यात ऊस दिला होता. कारखान्याने त्यावेळी प्लॉट क्रमांक, ओळखपत्र इत्यादी बाबींची माहिती मिळविली होती. त्यांनी संपूर्ण व्यवहार कसे घडवून आणले याचा आम्हाला काहीच पत्ता नसल्याचे तळे सांगतात.

महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या तपास आणि गुप्तचर विभागाने केलेल्या कारवाईत जीएसईएलने बनावट कागदपत्रे याच्या आधारे बँकेत खाते उघडले असल्याची माहिती समोर आली.  २०१९ मध्ये या संदर्भातील पुरावे न्यायालयात सादर केले आहे. कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर लगेचच जवळपास संपूर्ण रक्कम जीएसईएलच्या बँक खात्यात जमा झाली. त्यापैकी बहुतेक निधी जीएसईएलच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे. कारखान्याने कर्जाच्या पैशाची बनावट रक्कम अशा वेळी घेतली जेव्हा महाराष्ट्र सर्वात वाईट शेती संकटातून जात आहे. दुष्काळ आणि अवेळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम झाल्याने २०१५ ते २०१८ अखेरपर्यन्त ११,९९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये परभणी येथी १२४ जण आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण घरातील सरासरी मासिक उत्पन्न ८ हजार ते ९ हजार च्या घरात आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी, अनेक शेतकरी मजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.  याउलट, गुट्टे यांच्याकडे १३ कोटी ६३ लाख ५० हजार रुपये तर पत्नीच्या नावे १० कोटी ६६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. एकूण मालमत्तेचे चालू बाजारमूल्य तेव्हा २४ कोटी २९ लाख ५० हजार रुपये असल्याचे दर्शविण्यात आले होते. यावेळी या आकड्यांमध्ये वाढ  झाली आहे.

ऑगस्ट २०१६ मध्ये मारुती राठोड यांचे वडील आजरी पडले, उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी बँकेचा दरवाजा ठोठावला. बँकेत अर्ज केल्यानंतर त्यांना कर्ज मिळू शकणार नाही असे सांगितले. कारण विचारले असता तुम्ही दुसर्‍या बँकेतून पीक कर्ज घेतल्याचे सांगितले. हे ऐकून ते चक्रावून गेले.  त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा चालू केला. सुरुवातीला बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. परंतु राठोड यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बँकेने एका पत्राद्वारे तुमचे कर्ज फिटले असल्याचे कळवले.

राठोड म्हणतात “त्या क्षणापर्यंत जिथे ही शाखा आहे त्या शहरात मी गेलो नव्हतो”. गावापासून हे शहर ४०० किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे. मी अस्या बँकेकडून पैसे का घेणार?” कर्जाची माहिती मिळवण्यासाठी दुसरी शाखा नागपूरला असल्याचे सांगितले. या घटनेने राठोड यांची शंका वाढली, त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला आणि महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा शेतकऱ्यांसंदर्भातील घोटाळा समोर आला.  राठोड यांनी जुन २०१८ मध्ये गुट्टे यांच्याविरूद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केला. आपल्यासारखे २४ हजार शेतकऱ्यांच्या नावावर असे बनावट कर्ज असतील याची कल्पनाही राठोड यांना नव्हती.

अनेक गोष्टींत ठाकरे सरकारने फसवणूक केली; या सरकारचा मी धिक्कार करतो – सुभाष देशमुख

गुट्टे यांचे वकील मिलिंद क्षीरसागर यांनी गुट्टे यांच्यावरील फसवणूकीचा आरोप फेटाळून लावला. गुट्टे यांचे जावई राजभाऊ फड म्हणतात, “माझ्या सास-यांनी काही चूक केली असती तर त्यांना तुरूंगातून निवडणूक जिंकता आली नसती. ते स्वतः एक ऊस शेतकरी आहेत. हे प्रकरण “राजकीयदृष्ट्या प्रेरित” असल्याचे फड सांगतात. परंतु, न्यायालयात शेतकर्‍यांचे वकील प्रल्हाद बच्छाटे यांचे म्हणणे आहे की, गुट्टे यांनी फसवणूक केल्याचे सर्व कागदपत्रांमध्ये सिद्ध होते. त्यांनी बनावट कागदपत्र बनवून फसवणूक केली आहे.

जुलै २०१७ मध्ये सिंडिकेट बँकेच्या परभणी शाखेच्या लेखा परीक्षकांनी त्याच्या महाव्यवस्थापकांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये या संशयित घोटाळ्यामध्ये सामील झालेल्या अधिकारी वर्गाची माहिती होती. अधिकारी कर्जाच्या फायलींसह छेडछाड करत असल्याची माहिती लेखा परीक्षकांनी दिली होती. साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी बँकेचे संगणक व लॅन वापरल्याचा दावा केला आहे. बँक अधिकाऱ्यांना लाच गेली असावी असा निष्कर्ष या पत्रातून काढला गेला.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सहसचिव तुळजापूरकर यांचे म्हणणे आहे की बहुतेक ऊस कारखाने राजकारण्यांच्या जवळच्या लोकांच्या मालकीचे असतात आणि म्हणूनच बँक अधिकाऱ्यावर त्यांचे कर्ज सोडण्यासाठी राजकारणी दबाव आणत असतात.

मागील भाजप राज्य सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले अनिल बोंडे आणि भाजपचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांना या प्रकरणाविषयी विचारले असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास टाळले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावर विचारण्यात आले होते परंतु त्यांनी हि बोलण्यास नकार दिला. आमदार असलेल्या गुट्टेचा बचाव करणे एखाद्या राजकारण्याला अडचणीत आणू शकते, यामुळे कोणीही या प्रकरणावर भाष्य करण्यास तयार नसल्याचे राजकीय समीक्षक सांगतात.

हे सरकार शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणार – उद्धव ठाकरे

काय आहे प्रकरण

परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २४००० हजार हुन अधिक शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून तब्बल ५७८ कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगन्मत करुन ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले आहेत, ऊस पुरवला आहे अशा परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालन्यासह राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागतपत्र तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि मुंबईच्या रत्नाकर बँकेकडून तब्बल ५७८ कोटी रुपयांचे कर्ज परस्पर उचलले.

या कर्जाबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यामुळे रत्नाकर गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी भादंवि कलम 406,409,417,420 आणि 467,468,471,120-ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन वर्षांनंतर याप्रकरणी कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारीला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 27 मार्च रोजी औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड आणि डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करून गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात न्यायाधीश एस. जी. दुबाले यांच्यासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचे दोषरोप पत्रही दाखल केले.

कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे “ट्‌विटर मिशन”

कोण आहेत रत्नाकर गुट्टे?

रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.

गुट्टे हे गंगाखेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात, त्यांनी  २०१९ मधील विधानसभा निवडणूक तुरुंगातून लढवली आणि निवडणुकीत ते विजयी झाले. शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली होती.  त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला आहे. सद्या, गुट्टे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ( आमदार ) आहेत.

रत्नाकर गुट्टे हे रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. रासप हा महायुतीतील घटक पक्ष असताना गंगाखेडची जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यानंतर रासपचे अध्यक्ष महादेव जानकार यांनी भाजपावर टीका करीत गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी जाहीर करुन ते निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. महादेव जानकार यांनी भाजपावर टीका हि केली, परंतु त्यांच्या प्रचार पोस्टरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख फोटो होते.

रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते, सध्या गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या.

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ; मोदी सरकारचा मोठा निर्णय ,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार