ठाकरे सरकारच्या शपथविधीसाठी झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च

ठाकरे सरकारच्या शपथविधीसाठी झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च ud taking oath

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर या आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन अशा सहा कॅबिनेट मंत्र्यांना यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.

बुलडाण्यात थंडीचा जोर वाढला

उध्दव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या सोहळ्याचा खर्च दोन कोटी 79 लाखांवर गेल्याचे दिसून येत आहे. दादर येथे पुष्पसजावट तीन लाख रुपये, तर दादरच्या शिवाजी पार्कवरील विद्युतीकरणाच्या कामाचा खर्च तब्बल दोन कोटी 76 लाख इतका झाल्याचे दिसून येत आहे. तुलनेने उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फडणवीस सरकारपेक्षा दीड कोटींहून अधिक खर्च जास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी 30 हजार कोटींची गरज

तसेच भव्य शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दवेंद्र फडणवीस, रिलायंस कंपनीचे चेयरमॅन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खडगे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलाथ, डीएमके अध्यक्ष एमके स्टालिन देखील उपस्थित होते. शिवसेना, राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे.
ठाकरे सरकारच्या शपथविधीसाठी झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च 1