ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – सध्या राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवावर सध्या राज्य सरकारने निर्बंध जरी लागू केले असले तरी अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच कि काय आता महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधत्मक नियमांचं पालन केले पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसरी लाट किती काळ राहील, किती लांबेल आपल्याच हातात आहे. नियंमांचे पालन करायला पाहिजे, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ कोविडची तिसरी लाट राज्यात अद्याप आलेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी असल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. दुसरीकडे जगात मात्र तिसरी लाट आलेली आहे, मात्र ती सौम्य आहे आणि मृत्यूचे प्रमाण देखील कमी असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

तसेच सध्या महाराष्ट्रभर गणपती सुरु आहे, दसरा दिवाळी आहे, इतर सण-वार आहेत. लोकांचं म्हणणं होतं शिथीलता कमी करा, ती कमी केलेली आहे. परंतु टेस्टिंग कमी केलेलं नाही. यावर लसीकरण हाच पर्याय आहे. लसीकरणाची गती वाढली तर चांगलं होईल. प्रतिकारशक्ती वाढवण्याची देखील गरज आहे, यावर आता लसीकरण हाच उपाय आहे. असे देखील यावेळी टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –