fbpx

पिंपरीत ‘स्वाईन फ्लू’ चा कहर; 17 रुग्ण आढळले

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 15 दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्वाईन फ्लूची लागण झालेले तब्बल 17 रुग्ण आढळले आहेत. तर, वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी पालिकेच्या दवाखाना, रुग्णालयातर्फे जनजागृती राबविण्यात येणार आहे. लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. टॅमीफ्ल्यू गोळ्या, लसेची कमतरता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत

Add Comment

Click here to post a comment