पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी अडीच फुटांनी कमी

पंचगंगा नदी

पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने कोल्हापूरचा महापूर ओसरायला सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून जवळपास दोन ते अडीच फूट पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.११ फूट असून आलमट्टी धरणातूनसुद्धा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. परंतु, अध्यापही १० ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा काही तासात पूरस्थिती जैसे थे होण्याची शक्यता आहे.

महापुराचा फटका शहरासह जिल्ह्यातील २२३ गावांना बसला आहे. जिल्ह्यात १८ गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दीड लाख लोकांना स्थलांतरित करावे लागले. अशा या महाप्रलयाचा कोल्हापूरकारांना सामना करावा लागला. पण सध्या कोल्हापुरात पूर ओसरत आहे. गुरुवारपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी अडीच फुटांनी कमी झाली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

येत्या एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी

उद्योग उभारणीसाठी रशियन स्टील कंपनीला सहकार्य करणार – मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर

Loading...