कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या ट्रकला लागली आग

कापसाच्या गाठी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागल्याने २० टन माल जळून खाक झाला आहे. या अचानक लागलेल्या आगीत ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कुठलीच जीवीतहानी झाली नाही. मध्यप्रदेशमधील डेलची येथील ट्रक चालक राधाकिसन चौहान व त्याच्या सोबत क्लिनर वरदीराम सुर्यवंशी  हे दोघे कापसाच्या गाठी घेऊन मध्यप्रदेशातील मेहतवाडा येत जात होते.

मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरे करणार विठ्ठल-रखुमाईची महापुजा- सूत्र

काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास बुलडाणा नजीकच्या राजूर घाटात ट्रकमधील कापसाच्या गाठींना अचानक आग लागली. पाठीमागून येणाऱ्या एका वाहन चालकाने ही बाब ट्रक चालकास सांगितली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला वाहन थांबवले.आग विझविण्याचे कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आग वाढतच गेली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक डाव्या बाजूने उलटला. ट्रक चालकाने तात्काळ घटनेची माहिती ट्रक मालकास दिली. मालकाने नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचा नंबर मिळवत त्यांना कळविले. अग्निशामक विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले.

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत मुदत

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ट्रकमधील कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.