पुढिल दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरु करण्यात येईल

कोरोना लस

नवी दिल्ली – गेले आठ महिने देशासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या रोगावरील लस शोधण्याचं काम सद्या प्रगतीपथावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटसह हैद्राबाद व अहमदाबाद येथीस लस संशोधन करण्याऱ्या कंपनीला देखील त्यांनी भेट दिली होती.

या तिन्ही लसींना चांगल्या प्रमाणात यश मिळत असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यासह सुरुवातीला भारत, आशियाई देशांसह आफ्रिकेतील देशांना प्राधान्याने लस पुरवठा करणार असल्याचे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे.

एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एबीपी न्यूजशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. ‘देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.’ असं ते म्हणाले आहेत.

यासोबतच, “वॅक्सिनचं ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळणं गरजेचं आहे. पुढिल दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. संपूर्ण देशात लस पोहोचवण्यात येईल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला एक नाही, तर दोन ते तीन लस उपलब्ध होतील. जास्त वॅक्सिन असतील तर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.” अशी दिलासादायक माहिती देखील त्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –