ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे आता हवामान विभागाचा

पाऊस

जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. गुरुवारी (ता. १) दुसऱ्या टप्प्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजातही जूनचा सर्वसाधारण पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे.

आता तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामाच्या दुसऱ्या टप्प्‍यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर देशात सर्वसाधारण म्हणजेच १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (आयएमडी) जाहीर केला आहे. या अंदाजामध्ये ही तफावत होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या अंदाजामध्ये ८ टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका (९९ टक्के) पाऊस पडण्याची शक्यता ४५ टक्के असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. याच दरम्यान हवामान विभागातर्फे वेळोवेळी लावण्यात येणाऱ्या अंदाजामध्ये लोकांना आता विश्वास राहिलेला नाही असेही म्हणण्यात हरकत नाही. कारण हवामान विभागातर्फे जेव्हा जेव्हा अंदाज लावण्यात येतात तेव्हा ते अंदाज चुकीचे ठरतात असेही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांचा आता यावर विश्वास नाही असे म्हणण्यात हरकत नाही.

ऑगस्ट महिन्यात देशात ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रिन्सिपल कॉम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) व मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार (एमएमसीएफएस) हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सून एकूण हंगामातील (जून ते सप्टेंबर) पावसापैकी ४९ टक्के पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पडतो. १९६१ ते २०१० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीनुसार या दोन महिन्यांत देशात ४२८.३ सेमी पाऊस होतो.

तसेच प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान आणि वातावरणीय स्थिती ही ‘अल निनो’ सर्वसामान्य स्थितीत असल्याचे संकेत देत आहेत. तर, हिंद महासागराच्या विषुववृत्तीय भागात सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मॉन्सून हंगामात या दोन्ही स्थिती कायम राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आदित्य ठाकरे यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली

कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पोस्टरला फासले काळे , भीम ब्रिगेडच्यावतीने शासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी
Loading…