म्हशीला रेबीज झाला म्हणून संपूर्ण गाव गेलं दवाखान्यात

कोल्हापुरातील शिये गावात एक अजब-गजब प्रकार उघडकीस आलेला आहे. शिये गावातल्या एका म्हशीला कुत्र्याने चावा घातला. कुत्र्याच्या चावामुळे रेबीज होऊन या म्हशीचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात आपल्याला रेबीज होईल का ही भीतीच गावकऱ्यांमध्ये पसरली. याच भीतीतून गावातल्या २०० जणांनी रेबीजची लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गावातील प्रत्येक परिवाराला सरकारकडून 10 लाख रुपये देण्यात येतील – मुख्यमंत्री

यासंबंधीची माहिती शासकीय विभागांना समजताच तिथले आरोग्य अधिकारीही गावात आले. ज्या नागरिकांनी दूध उकळून घेतलं असेल त्यांच्यासाठी काळजीचं कारण नाही. पण ज्यांनी म्हशीचं दूध न उकळता घेतलं आहे त्यांनी रेबीजचा प्रतिबंध करणारी लस घेणं आवश्यक आहे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण

म्हशीच्या वैद्यकीय अहवालानंतर डेअरीतून त्या म्हशीचे दूध खरेदी केलेल्या ग्राहकांबरोबरच रोज दूध विकत घेणाऱ्या असलेल्या ग्राहकांची चांगली तारांबळ उडाली आहे. म्हशीच्या दुधामुळे आपल्याला धोका तर नाही ना अशी शंका नागरिकांच्या मनात आहे.गावातले शेकडो गावकरी या म्हशीचं दूध वापरात आणत होते. गावात जशी म्हैस मेल्याची बातमी पसरली तसे गावकरी आपल्याला रेबीज होईल का? या भीतीने घाबरले. त्यानंतर गावकऱ्यांनी रेबीजचा प्रतिबंध करणारी लस घेण्यासाठी थेट दवाखाना गाठला. सध्या शिये गावात याच विषयाची चर्चा आहे.