भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही - राजू शेट्टी raju sheety

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देऊन त्यांचा सात बारा उतारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी राजू  शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघनटेच्या वतीने येथील संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टिकास्त्र सोडले.

बँक भरती परीक्षा आता मराठीतही – केंद्र सरकार

शेट्टी म्हणाले, ‘‘भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकारही शेतकरी विरोधी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्ठात आणून बाजार समित्या हा राजकीय अड्डा बनवण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीचा लाभ काही शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे  सरकारने थकबाकी बरोबरच चालू पीक कर्जही माफ करावेच, पण सरसकट सात-बारा कोरा करण्याचे दिलेले आपलेच आश्‍वासन पूर्ण करावे.’’

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, भाजीपाल्याचे दर घसरले

‘‘राज्यातील सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज ठाकरे जर शॅडो कॅबिनेटसारखी संकल्पना राबवत असतील, तर त्यांच्या संकल्पनेचे स्वागत आहे’’, असेही ते म्हणाले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, नवनाथ माने, समाधान फाटे, अतुल कारंडे, रणजित बागल, विष्णुपंत बागल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.