करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. पुणे येथील पाचही जणांना घरी सोडण्यात आले. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 5 जणांपैकी 3 जणांना घरी सोडले आहे.
नागरिकहो सावधान..! आता पुण्यात आलीये मगर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि नांदेड येथील भरती केलेल्यांनाही घरी सोडण्यात आले.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून आतापर्यंत 5 हजार 128 इतके प्रवासी तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी 4 प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी 34 प्रवासी असे एकूण 38 प्रवासी बाधित भागातून आलेले आढळले आहेत.
वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल
करोना संदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 104 उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा, पुणे यांच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमधील कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 020-26127394 असा आहे.
येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत https://t.co/b4q0oO0gxg
— Krushi Nama (@krushinama) February 2, 2020