औद्योगिक वापरासाठी आणि घरगुती वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर असावेत

औद्योगिक वापरासाठी आणि घरगुती वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर असावेत suger

औद्योगिक वापरासाठी आणि घरगुती वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर असावेत, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारला केलेली आहे. सामान्य ग्राहकांवर अन्याय होऊ न देता साखर उद्योग मजबुतीनं टिकवायचा असेल, शेतकऱ्यांनाही योग्य दर देण्यासाठी हा उपाय असल्याचं या महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

दोन लाखांची कर्जमाफी हे बुजगावणं – बच्चू कडू

साखर वापरात भारत हा जगात पहिला आहे.  2018 पासून केंद्र सरकारनं साखरेसाठी किमान विक्री दर ठरवला आहे. घरगुती आणि औद्योगिक दोन्ही वापरांसाठी कारखान्यांना एकाच दरात साखर विकावी लागते. नवं धोरण अंमलात आलं तर संकटातील साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. साखर उद्योगाचं अर्थकारण बदलण्यासाठी हा चांगला मार्ग असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.

वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला

साखरेच्या उत्पादनावर प्रति किलो खर्च 34 रुपये आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनाही वाजवी दर देताना अडचण होते.ही कोंडी फोडण्यासाठी आपण ही मागणी केल्याचं राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे एमडी प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले आहे. घरगुती वापरासाठी 30 ते 35 रुपये औद्योगिक वापरासाठी 60 रुपये असा सध्याचा महासंघाचा प्रस्ताव आहे.