‘या’ जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत झाली मोठी घट

कोरोना

बीड – कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती मात्र आता जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. तसेच योग्य उपचारांमुळे कोरोना झालेले रुग्ण या महामारीतून बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोनावर मात करत त्यातून मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने बीडकरांना थोडा दिलासा मिळत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लावण्यात आलेले कडक निर्बंध व नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्याचे बघायला मिळत आहे. शनिवारी ११५० नवे रुग्ण आढळले तर १२१९ कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णांचा आकडा ७३ हजार ५२५ झाला. २४ तासांतील १८ तर जुन्या १६ अशा एकूण ३४ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. शुक्रवारी ४४४७ जणांची कोरोना चाचणी केली. याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यात ११५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळाले. तसेच आरोग्य विभागातर्फे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करून अँटिजन चाचणी केली जात आहे. बीडमध्ये शनिवारी (दि.१५) १८१ हिंडफिऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २५ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ८०, आष्टी १९४, बीड २७९, धारूर ६९, गेवराई ९७, केज १०३, माजलगाव १००,परळी ३८, पाटोदा ६७, शिरूर ९२, वडवणी ३१ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७३ हजार ५२५ इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६५ हजार ४८६ इतकी झाली आहे. जुन्या १६ तर नवीन २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांची नोंद नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १३७८ झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –