राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पाऊस होणार

पाऊस

पुणे – राज्यातील विविध भागात पुढील २ दिवस जोरदार  पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर राज्यात आज आणि उद्या कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

त्याचबरोबर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. तसेच मराठवाडा विदर्भातही पाऊस पडत आहे. राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. तर राज्यातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

राज्यात आज पूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे तसेच उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या –