महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

पाऊस

मुंबई – सध्या पावसाने जोरदार आगमन केल्याने मुंबई, कोल्हापूर आणि राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी तर अगदी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. आता पुन्हा २-३ दिवसांची विश्रांती घेतल्यावर पाऊस मुसळधार बरसण्याची शक्यता आहे. पुढच्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून कळवण्यात आले आहे.

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

पश्चिम किनारपट्टीवर, तसेच घाट भागात ढगांची‌ दाटी आहे. मुंबईतही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढच्या २४-४८‌‌ तासात कोकणात व मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुन्हा ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात

सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात आज १० हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी – राजेश टोपे

पालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे