निरोगी आरोग्य राहण्यासाठी फळे(Fruits) खाणे गरजेचे असते.फळ खाल्याने आपल्यला आवश्यक असणारे जीवनसत्वे तसेच खनिजे मिळतात परंतु बघुयात केली खाल्याने काय होतात फायदे .
केळीमध्ये(Banana) व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, प्रथिने, कॅल्शिअम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह असे पोषक घटक असतात.
केळी(Banana) हे अनेक पोषक तत्वांनी भरलेले एक गोड आणि स्वादिष्ट फळ आहे. केली प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन बाजारपेठेत निर्यात केले जातात.
केळीमध्ये(Banana) प्रामुख्याने पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. विविध पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध असल्याने केळी विविध रोगांसाठी एक चांगला स्रोत बनली आहे. जसे की हृदयाचे आरोग्य, हाडांचे आरोग्य, त्वचेची काळजी, नैराश्य आणि चिंता इत्यादी.
बघुयात केळीमधील(Banana) घटक प्रमाण –
पोटॅशियम – ६५८ मिग्रॅ, मॅग्नेशियम – २७ मिग्रॅ, मॅंगनीज – ०.२७ मिग्रॅ, व्हिटॅमिन बी ६ मिग्रॅ, ऊर्जा – ८९ Kcal, कार्बोहायड्रेट – २२.८४ ग्रॅम, साखर – १२.२३ ग्रॅम
फायबर – २.६ ग्रॅम, चरबी – ०.३३ ग्रॅम, प्रथिने – १.००९ ग्रॅम
केळी(Banana) अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने विविध रोगांवर केळी खाणे खूप फायदेशीर आहे
केळी(Banana) हृदयाच्या आरोग्यासाठी, विशेषतः रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच केळी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते, आपला तग धरण्याची क्षमता वाढवते, पचनसंस्था, चांगली त्वचा आणि केस गुळगुळीत ठेवण्यास मदत करते.
केळी(Banana) वजन कमी करण्यास आणि मेंदूला चालना देण्यास मदत करतात केळ्यामध्ये असंख्य अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे अनेक आरोग्य फायद्यांशी जोडलेले असतात. जसे की डोपामाइन, कॅटेचिन्स आणि अँथोसायनिन्स.
जेवण झाल्यांनतर केली खाल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच, ते तुमचे पोट रिकामे होण्याचे प्रमाण कमी करून तुमची भूक नियंत्रित राहते.
केळी निरोगी व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकत नाहीत. तसेच मधुमेह असलेले लोक केळीचा आस्वाद घेऊ शकतात.
परंतु जास्त प्रमाणात केळी(Banana) खाणे आरोग्यास घातक आहे दिवसातुन दोन जरी केळी खाल्यास ते लाभदायक ठरेल.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – उद्यापासून राज्यात थंडीचा कडाका कधी कमी होणार
- शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न –
- सकाळी अनशापोटी गुळ फुटाणे खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून
- मोठा दिलासा – सलग चौथ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी
- राज्यातील जीआय मानांकनाना प्रतिष्ठा मिळवून देणार – दादाजी भुसे