लसणाचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत.त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी म्हणून भारतात वापरण्यात येत होता. दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. चला तर मग जाऊन घेऊ फायदे….

कांदा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

  • लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अ‍ॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
  • रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.
  • लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.

कारले लागवड कशी करावी, जाणून घ्या

  • लसणाच्या सेवनामुळे व्हायरल, फंगल, यीस्ट आणि वर्म यांचा संसर्ग होत नाही. ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.
  • लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थमासारख्या श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे.
  • लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात अ‍ॅण्टी बॅक्टेरियल तत्त्व असतता. त्याचा फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?