रोज 2 केळी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे !

वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. केळ हे आरोग्यासाठी फादेशीर आहे. प्रत्येक ऋतुमध्ये +मिळणारं एकमेव फळ केळ हे सर्वांच्या खिशाला परवडणारं आहे.

केळामध्ये अनेक पोषकतत्व असतात. प्रथिनं, खनिजं,  अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती यामध्ये असते. दोन केळी खाल्ली की ऊर्जा मिळते आणि भूकही शमते. त्यामुळे अति भूक लागल्यानंतर केळ खाऊ नये त्यामुळे भूक मरते असंही तज्ज्ञ सल्ला देतात.

  • केळ्यानं शरीराला ऊर्जा मिळते. हिमोग्लोबिन वाढतं. पिकलेली केळी खाल्ल्यानं शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात.
  • पिकलेल्या केळ्यात पोटॅशियम जास्त असतं. सोडियम कमी असतं.त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. शरीराचं मेटॅबोलिजम चांगलं राहतं.
  • जास्त पिकलेली केळी खाल्ली की कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
  • मासिक पाळीच्या वेळी होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास कमी करण्यासाठी पिकलेलं केळं उत्तम आहे.
  • केळं हे आरोग्याला चांगलं असतं. पण ज्या केळ्यांवर काळे डाग पडलेले असतात, त्याचा आरोग्यासाठी जास्त फायदा होतो.
  • केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना मजबूती मिळते. त्यामुळे रोज लहानांपासून मोठ्यांनी केळ खाणं आवश्यक आहे.
  • भाजलेल्या ठिकाणी केळ्याची साल अथवा केळ लावावं. शरीराचा दाह कमी होण्यासाठी मदत होते.

महत्वाच्या बातम्या –