राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामेच नाही

शेतकरी अडचणीत

सोलापूर – राज्यात जून ते ऑगस्ट या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब निर्दशनास आली असून नुकसानग्रस्त शेती पिकांचे संयुक्‍त पंचनामे करण्यात यावे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची माहिती, क्षेत्र, नुकसानग्रस्त शेतकरी यांची माहिती तत्काळ द्यावी, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सर्व विभागीय आयुक्‍तांना पाठविले. मात्र, अद्याप एकाही जिल्ह्यातून पंचनामा अहवाल प्राप्त झालेला नाही.

विदर्भातील नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर जून ते ऑगस्ट या काळात नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करावा लागणार आहे. जेणेकरून नुकसानग्रस्तांना वेळेत मदत करता येईल, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील सर्वच विभागीय आयुक्‍तांना दिले. त्यांच्याकडून तशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली. मात्र, अद्याप एकाही जिल्ह्याचा पंचनामा अहवाल सरकारकडे आलेला नाहीत.

नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला पूर आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागला. सरकारकडून मदतीची अपेक्षा असतानाही अद्याप पंचनामेच झालेले नाहीत.

दरम्यान, नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांमधील सुमारे २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –