अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा !

आज नवीन आर्थिक वर्ष २०२०-२०२१या साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले आहे. या बजेटकडून सर्वसामान्यांना फार अपेक्षा आहेत. या बजेटमुळे काय महाग होणार काय स्वस्त होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

आजच्या सादर केलेल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केला आहे.यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही फायदेशीर घोषणा यात केल्या आहेत.शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी १६ पॉइंट्सचा एक्शन  प्लान त्यांनी बजेट मांडताना जाहीर केला.

डाएटमध्ये समावेश करा ‘या’ पदार्थांचा

६.११ कोटी शेतकरी विमा योजनेचा लाभ घेत आहेत.तसेच आता २० लाख शेतकऱ्यांसाठी सोलार पंप योजना त्यांनी जाहीर केली आहे. कृषी क्षेत्रासाठी तब्बल २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.