कापूस खरेदीबाबत संवेदनशीलपणे विचार करा – पालकमंत्री राठोड

यवतमाळ – पावसाळ्याला सुरवात झाली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी झाला पाहिजे. यासाठी जिल्हा उपनिबंधक, सीसीआय आणि कॉटन फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी अंतिम नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

येत्या २० एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस – बाळासाहेब पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस खरेदीचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, सीसीआयचे प्रतिनिधी अजयकुमार, कॉटन फेडरेशनचे प्रतिनिधी श्री. महाजन, वनमंत्र्यांचे खाजगी सचिव रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

बीड जिल्हयातील बंद असलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कापूस खरेदीबाबत आता नोंदणी होणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्हा उपनिबंधक, सीसीआय व कॉटन फेडरेशन यांनी समन्वय साधून कोणत्याही परिस्थतीत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी करावा. तालुका स्तरावरून उर्वरित टोकनधारकांना संदेश द्यावा. नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी येथील जिनिंगमध्ये सीसीआयमार्फत खरेदी करण्यात येईल. जिल्ह्यात आज रोजी 17401 नोंदणीधारक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी बाकी आहे. यापैकी 8987 शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय तर उर्वरित 8414 शेतकऱ्यांचा कापूस फेडरेशनने कोणत्याही परिस्थतीत खरेदी करावा. तसेच टोकन वाटप यंत्रणेत गडबड होऊ देऊ नका. ठरवून दिलेल्या गाड्यांपेक्षा एकही गाडी कमी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त कितीही गाड्या पाठविण्यास कोणताही आक्षेप नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चना आणि तूर खरेदीचाही आढावा घेतला.

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, पुढील दहा दिवस सर्व सहाय्यक निबंधकांनी नोंदणीधारक शेतकऱ्यांना संदेश, ठरवून दिलेल्या गाड्यांचे नियोजन आदी कामे प्राधान्याने करावी. प्रत्येक जिनिंगवर किती शेतकरी येणार त्याचा दैनंदिन अहवाल 30 जूनपर्यंत नियमित सादर करावा. सीसीआयतर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या वणी येथील जिनिंगवर आर्णी आणि दारव्हा तालुक्यातून रोज किमान 100 गाड्या तर घाटंजी येथील जिनिंगवर नेर आणि दिग्रस तालुक्यातून रोज किमान 50 गाड्या गेल्याच पाहिजे. मात्र असे असले तरी सहाय्यक निबंधकांनी जास्तीत जास्त गाड्या पाठविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

शरद पवारांनी केंद्राकडे साखरेकरिता पॅकेज मागितले परंतु कापसाकरिता एक शब्द ही बोलले नाही, विदर्भ- मराठवाड्याचे हेच दुर्दव

जिल्ह्यात कापूस खरेदीकरिता 52823 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सर्वेक्षणातून कपात झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या 10732 आहे. त्यामुळे राहिलेल्या 42091 नोंदणीधारक शेतकऱ्यांपैकी 24690 शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय आणि फेडरेशनमार्फत खरेदी करण्यात आला आहे. नोंदणी झालेल्यांपैकी 17401 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे बाकी आहे. यात सीसीआयमार्फत 5620 तर कॉटन फेडरेशनमार्फत 11781 शेतकरी बाकी आहे. मात्र पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन त्वरीत कापूस खरेदी होण्यासाठी 17401 नोंदणीधारक शेतकऱ्यांपैकी 8987 शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय आणि 8414 शेतकऱ्यांचा कापूस फेडरेशन खरेदी करणार आहे. बैठकीला जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांच्यासह सर्व सहाय्यक निबंधक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार – अमित देशमुख

कापूस खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी केला चक्काजाम