राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – राजेश टोपे

कोरोनाच्या चाचण्या

कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

मुंबई – राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मेथीची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

बेरोजगार लोकांना साखर उद्योगांमध्ये रोजगाराची संधी