‘या’ जिल्ह्याला मिळाला २५ हजार लसींचा साठा, आजपासून पुन्हा जिल्ह्यातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु

कोरोना लस

औरंंगाबाद : मनपाकडील लस संपल्यामुळे शुक्रवारी लसीकरण बंद करावे लागले. लस कधी येईल याची ठोस माहितीही कोणीही दयायला तयार नव्हते. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता वाटत असतानाच शासनाकडून महापालिकेला २५ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. लसीचा साठा मिळाल्यामुळे सोमवारी (दि.२६) शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण सुरु झाले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जंम्बो लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या वतीने शहरात सर्व ११५ वार्ड मध्ये ४५ वर्ष पुढील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे .या लसीकरण मोहिमेस नागरिकांचा उत्स्पूâर्त प्रतिसाद मिळत आहे. लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण मोहीम थांबेल का अशी शक्यता वाटत होती. या अनुषंगाने मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार मनपाने शासनाकडे दिड लाख कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची मागणी करण्यात आली होती.

शासनाकडून मनपाला २५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून शहरातील सर्व केंद्रावर लसीकरण पूर्वरत सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –