‘या’ जिल्ह्याला मिळाला राष्ट्रीय पातळीचा ‘स्कॉच’ पुरस्कार

कोरोना बाबतच्या कार्याची घेतली दखल

वर्धा – स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कॉच ॲवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.

सीताफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. शिवाय विविध उपाययोजना केल्या. स्कॉच पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर ऑनलाईन पद्धतीचा वापर करून झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या याची माहिती देण्यात आली. पहिली फेरी, दुसरी फेरी असे करीत वर्धा जिल्हा या पुरस्कारासाठी अंतीम फेरीत पोहोचला. पीपीटीद्वारे अंतीम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवीन सोना यांच्या कार्यकाळातही मिळाला होता बहुमान जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला स्कोच अवार्ड प्राप्त झाला होता. त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे वर्धा जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झाला होता तर आता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

विवेक भीमनवार जिल्हाधिकारी वर्धा :-

हा पुरस्कार  जिल्ह्यातील  सर्व नागरिक, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामविकास आणि नगरविकास, जिल्हा परिषद आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या परिश्रमाचे फळ आहे. आतापर्यंत जिल्ह्याने उत्कृष्ट काम करून कोरोनाची संसर्ग कमी ठेवण्यासाठी काम केले. यापुढेही जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही साथ द्यावी असे आवाहन  जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 महत्वाच्या बातम्या –

सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे




Loading…