या जिल्ह्याला मिळणार चार दिवसात ३ हजार टन युरिया

युरिया खत

अहमदनगर – युरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरुपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते (एनएच+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. नायट्रोजनच्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो वनस्पतींचे शोषून घेऊ शकतात, दूसरा प्रकार् नायट्रेट (एन् ओ ३-) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती

हे खत जर शेतीमध्ये जास्त वापरले तर त्याने नुकसानदेखील होते. तसेच सध्या शेतीमध्ये गरजेपेक्षा जास्ती युरिया खताचा वापर वाढल्याने टंचाई जाणवत आहे. सध्या गरजेपुरेता युरिया हा नगर जिल्ह्याला उपलब्ध होत आहे. तसेच नगर जिल्ह्यासाठी चार दिवसात सुमारे ३ हजार १०० टन युरिया खत मिळणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

तसेच शेतकऱ्यांकडून युरिया खताची टंचाई जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत माहिती देताना शिवाजी जगताप म्हणाले की, जिल्ह्याला खरिपासाठी लागणाऱ्या युरिया खतापैकी आवश्यक खत उपलब्ध झाले आहे. १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान तब्बल ११ हजार ८५० टन युरिया खत उपलब्ध होत आहे. तसेच नगर जिल्ह्यासाठी सोमवारी म्हणजेच २७ जूनला ३ हजार १०० टन खताची रॅक उपलब्ध होत आहे. त्यामुळे युरीया खताची आजीबात टंचाई भासणार नाही.

महत्वाच्या बातम्या – 

आता शहरासोबत ग्रामीण भागातही मास्क बंधनकारक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना आदेश

आता मजदूरांना होणार फायदा; देशातील वीस राज्यात सुरू झाली ‘ही’ योजना