‘हे’ औषध फक्त 24 तासांतच करणार कोरोनाचा खात्मा

कोरोना लस

न्यूयॉर्क – गेले वर्षभर कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. जवळजवळ सर्वच देशांत या कोरोनाचा शिरकाव झाला आणि लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोणतंच प्रभावी औषध नसल्यानं या रोगाची तीव्रता वाढली होती. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जणू सर्व जगचं थांबल होतं.

मात्र, गेल्या महिन्याभरात दिलासादायक वृत्त हाती येत असून शास्त्रज्ञांना लस शोधण्यात यश येत आहे. भारतीय बनावटीच्या दोन लस देखील लवकरच उपलब्ध होणार आहेत. अशातच, आता आणखी दिलासादायक वृत्त हाती येत आहे. कशी पाठोपाठ आता कोरोनावरील औषध देखील शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. यासोबतच, कोरोनावर उपचारासाठी तोंडावाटे घेतलं जाणारं हे पहिलं औषध आहे.

हे औषध फक्त 24 तासांतच कोरोनाचा खात्मा करण्यात सक्षम आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एमके-4482/ईआइडीडी-2801 असं या औषधाचं नाव आहे. औषधाला मोल्नुपिरावीर म्हणूनही ओळखलं जातं. हे औषध कोरोना संक्रमण पसरण्यापासून रोखू शकतं. याशिवाय कोरोना रुग्णांना भविष्यात होणाऱ्या इतर आजारांपासूनही त्यांना वाचवू शकतं, असं शास्त्रज्ञ म्हणाले.

अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे औषध शोधलं आहे. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार जर्नल ऑफ नेचर माइक्रोबायोलॉजीमध्ये या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीच्या अभ्यासात हे औषध इन्फ्लूएन्झासारख्या फ्लूचा नाश करण्यात परिणामकारक दिसून आलं होतं. त्यानंतर कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी यावर अभ्यास करण्यात आला. यानंतर विविध प्राण्यांना कोरोना संसर्गित करण्यात आलं व या औषधाच्या पर्णिमांचं निरीक्षण करण्यात आल्याचं संशोधनाचे अभ्यासक रिचर्ड प्लेंपर यांनी सांगितलं आहे. या अभ्यासानुसारच त्यांनी हे औषध २४ तासांत कोरोना संसर्गाचा नाश करू शकतो असा दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या –