हे कुंभकर्णी सरकार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाढ झोपलेले आहे – बबनराव लोणीकर

बबनराव लोणीकर

जालना-  शेतकऱ्यांचे सरकार म्हणून कुरघोडी करत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणताही कळवळा नसून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत करू म्हणणारे देखील आज शब्द फिरवत आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी ची मदत आजपर्यंत मिळालेली नाही. या गोष्टीचे तरी तात्काळ पंचनामे करा आणि आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून आर्थिक मदत करा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला ठणकावले.

वाटुर फाटा तालुका परतुर येथे शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केल्यानंतर विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर भाऊराव देशमुख मनोज पांगारकर गणेशराव खवणे माऊली शेजुळ रमेश महाराज वाघ सतीश निर्वळ संदीप भैय्या गोरे रमेश भापकर प्रकाश टकले संजय तौर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव जिल्हा परिषद सदस्य हरीराम माने पंजाब बोराडे शिवदास हनवते गणपतराव वारे सुभाष राठोड अंकुशराव बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की हे कुंभकर्णी सरकार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाढ झोपलेला आहे. या सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खंबीर असून आतापर्यंत दिलेला एकही शब्द सरकारने पूर्ण केलेला नाही. केवळ दिशाभूल करणे आणि आलेली वेळ पुढे ढकलणे असा नित्य कार्यक्रम या सरकारने सुरू केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार अजिबात गंभीर नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा पूर्णपणे विश्वासघात केला असून शेतकरी महा विकास आघाडी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात लोणीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून शेतकरी आत्महत्या वाढू शकतात परंतु सरकारला या बाबीचे अजिबात गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकार गंभीर नाही. पिक विमा अद्याप मिळालेला नाही नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झालेली नाहीत. ऊस कापूस मूग उडीद सोयाबीन मका मिरची यासारखी अनेक पिके पूर्णपणे अतिवृष्टीमुळे सडून गेले. असून शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे शेतकऱ्यांसमोर अत्यंत विदारक असं चित्र निर्माण झालेलं असताना देखील सरकारला गांभीर्य नसणे ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे देखील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री टोलवाटोलवी करण्याचे काम सरकार करत आहे. सरकार पूर्णतः पिक विमा कंपन्यांच्या बाजूने काम करत आहे. बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी देखील सरकार पूर्णतः बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या बाजूने आहे 80 ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या असताना देखील एका ठिकाणी सरकारने दोषी असणाऱ्या बियाणे कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आणि मालकाला अटक केली नाही आणि अतिवृष्टी बाबत तर शेतकऱ्यांना शेताचे पंचनामे कधी होतील याची शाश्वती नाही. महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येणारे पंचनामे विमा कंपनीला मान्य नाहीत. विमा कंपन्यांकडे पंचनामे करण्यात मनुष्यबळ नाही जिल्हाधिकारी आदेश काढून पंचनामे करण्याबाबत सूचना करतात परंतु जर पंचनामे विमा कंपनी ग्राह्य धरणारच नाही आणि विमा कंपनी कडे मनुष्यबळ असेल तर शेतकऱ्यांनी करावा काय असा सवाल देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला.

यावेळी शत्रुघ्न कणसे शहाजी राक्षे गणेश चव्हाण माऊली गोडगे विलास घोडके निवास देशमुख नारायण काकडे शंतनू काकडे राजू दादा वायाळ माधव सिंग जनकवार उद्धव वायाळ संभाजी वारे रामेश्वर तनपुरे बाळासाहेब पवार अतिष राठोड नारायण बागल आबासाहेब सरकटे गणेश चव्हाण बाळासाहेब तौर महेश पवार उदय राठोड प्रकाश नानोटे तुकाराम वैद्य गजानन शिंदे श्रीराम जाधव एकनाथ जाधव प्रभाकर जाधव बाळासाहेब हजारे द्वारकादास चींचाने अनिल राठोड दत्ता खराबे कैलास नवले बाळासाहेब इंगळे प्रा.सहदेव मोरे पाटील संजय डोंगरे गजानन उफाड विजय घाडगे सुरेश डोंगरे योगेश ढोणे शुभम आडे सचिन राठोड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –