प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

प्लाझ्मा थेरपी

नवी दिल्ली- करोनावरील उपचारांमध्ये महत्वाची मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे.

कोविड-19साठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्स-आयसीएमआरच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत, सर्व सदस्यांनी कोरोनावरील उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्यास सहमती दर्शविली, त्यानंतर सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. कोविड-19 रुग्णांच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे आढळलेले नाही.

यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. ICMR चे वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणाले की, बीजेएममध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून प्लाझ्मा थेरपीचा कोणताही फायदा नसल्याचे समोर आले. प्लाझ्मा थेरपी महाग आहे आणि यामुळे भीती निर्माण होत आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेवर ओझे वाढले असूनही रुग्णांना मदत होत नाही.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत २,८१,३८६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २,४९,६५,४६३ वर पोहोचली. याच कालावधीत ४१०६ जण मृत्युमुखी पडल्यामुळे करोना मृत्यूंचा आकडा २,७४,३९० इतका झाला आहे

महत्वाच्या बातम्या –