गोंदिया जिल्ह्यात भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण

गोंदिया जिल्ह्यात भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण godwon

गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र गोदामात पडून असलेल्या ६० हजार मेट्रीक टन तांदळाची उचल अद्यापही झालेली नाही. परिणामी आता भरडाई केलेला हजारो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

यंदा आत्तापर्यंत २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. मात्र आधीच भरडाई केलेल्या १४ लाख क्विंटल  तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी धानाच्या भरडाईचे आदेश द्यायचे कसे अशी समस्या या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाली आहे. कृषी विभागाने मागील खरीप हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर

मागील वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात एकूण १८ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर यंदा ५ फेब्रुवारीपर्यंत १९ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.त्यामुळे मागील वर्षीपेक्षा आतापर्यंत दीड लाख क्विंटल खरेदी अधिक झाली आहे. तर खरीप हंगामातील खरेदी मार्चपर्यंत चालते. त्यामुळे पुन्हा आठ ते दहा लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गोदाम हाऊस फुल असल्याने भरडाईसाठी धानाची उचल करण्याचे आदेश देण्याची अडचण निर्माण झाली आहे.