‘हा’ साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा; शेतकऱ्यांची मागणी

साखर

उस्मानाबाद – जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा कारखाना आणि मारठवड्यातील पहिला साखर कारखाना आसा ओळखला जाणारा तेरणा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनीही याबाबत `स्थानिक नेत्यांनी जबाबदारी घ्यावी` अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना एक आशा लागली आहे.

मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून ओळखला जाणारा तेरणा सहकारी साखर कारखाना आहे. गेली अनेक वर्षे या कारखान्यावर माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची सत्ता होती. त्यानंतर हा साखर कारखाना विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाकडे गेला आहे. कारखाना राजकारणाचे केंद्र असला तरी यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखाना सुरू झाल्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबू शकत नाही. त्यातच उपमुख्यंत्री अजित पवार यांनी याबाबत `स्थानिक नेत्यांनी पुढाकर घ्यावा` अशी सूचना केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत

जिल्ह्यात सध्या अनेक साखर कारखाने आहेत. काहीची क्षमता एक हजार ते अडीच हजार टन प्रतिदिन अशी क्षमता आहे. तर एकट्या तेरणा साखर कारखान्याची क्षमता १० हजार मेट्रिक टन प्रतिदिन आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखाना सुरू झाला तर परिसरात चार ते पाच कारखाने सुरू झाल्यासारखे आहे. जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षे दुष्काळ होता. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. शिवाय परिसरातील तेरणा, मांजरा यासह इतर छोट्या-मोठ्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. परिणामी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वात मोठा तेरणा साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या –