यंदा हापूस रुसला, हापूसचे`इतकेच`उत्पादन

hapus amba

आता थंडी संपत आहे त्याबरोबरच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळा म्हटलं की त्यात सर्वाना चाहूल लागते ती म्हणजे आंब्याची. आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे हापूस आणि तो आंबा न आवडणारा मनुष्य तसा विरळाच! कोकणाचा राजा असलेला आंबा भारतात व भारताबाहेरही त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हा हा खास हापूस आंब्यासाठी प्रसिध्द असून येथे सुमारे ६५,००० एकरांपेक्षा जास्त क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे व भारतातील सगळ्यात जास्त हापूस आंब्याचे उत्पादन हे रत्नागिरीत होते.

शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ; आता वेबसाइटवरूनच विमा पावत्या ‘डिलीट’ !

तसेच रत्नागिरीत ह्या बदलेल्या वातावरणाचा परिणाम हा यंदाच्या आंबा हंगामावर होणार आहे. त्यामुळे बागायतदारांच्या हाताला 15 टक्‍केच पीक लागणार आहे. त्याबरोबरच लोकांना यावर्षी आंब्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे. तसेच याच्या दारातही खूप मोठी घसरण होईल. यामुळे याचा आंबा बागायतदारांना फटका बसणार आहे. वातावरणामुळे मार्चमध्ये काहीच पीक हाती येणार नाही.  पीक हाती येणार नसल्याकारणामुळे उत्पन्नात सुद्धा घट होईल, अशी चिंता आंबा उत्पादकांनी व्यक्‍त केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सव

निसर्गाच्या चक्रात हा आंबा अडकलेला आहे आणि आंबा यंदा उशिरा येणार आहे. आंब्याला नोव्हेंबरमध्ये येणारा मोहोर हा जानेवारीत येऊ लागला. ढगाळ वातावरण आणि उशिरा पडत असलेली थंडी यामुळे पुनर्मोहोराचे संकट निर्माण झाले आहे. त्यातही बागायतदारांना किडरोगांपासून मोहोर वाचवण्यासाठी 10 ते 15 वेळा फवारणी करावी लागत आहे.

इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

बागायतदारांना फवारणीचाच खर्च हा 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. एवढे करूनही त्यातून वाचलेला आंबा एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यातच येईल. खर्च भरून निघावा यासाठी 40 ते 50 रुपये किलोला दर मिळायलाच हवा. ही मागणी शासनाकडे करणार असल्याचे बागायतदारांनी सांगितले.

तसेच शेती अवजारे, कीटकनाशके, खते यांच्यावरील जीएसटी माफ करावा. विमा हप्ता परवडत नसल्याने अनेकांनी पिकाचा विमा काढलेला नाही. राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपनीला रक्‍कम न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. यामुळे शेतकरी कर्जमुक्‍त होईल.

महत्वाच्या बातम्या –

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही