आंदोलनाच्या नावाखाली दूध वाया घालवणाऱ्यांना लाज वाटायला हवी – आकांक्षा पुरी

आकांक्षा पुरी

मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. मात्र हा लॉकडाऊन शेतकरी वर्गासाठी मोठा नुकसानीचा ठरला आहे. या काळात दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

तुम्हाला सतत चहा पिण्याची सवय आहे, तर मग चहामध्ये ‘हे’ पदार्थ ठरतील लाभदायक……..

दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. महायुती आणि राजू शेट्टी यांनी या विरोधात आवाज बुलंद केला आहे. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर दूध संप पुकारत अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडत दूध विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

ग्रामीण भागातील अतिदक्षता विभागाची सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांशी करार करावेत – अजित पवार

दुधाचे टँकर फोडत दूध रस्त्यावर ओतून देणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच संतापली आहे. आकांक्षा पुरी हिने दूध रस्त्यावर ओतून आदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक

टँकरमधून दूध रस्त्यावर ओतलं जात असतानाचा एक व्हिडिओ ट्वीट करत आकांक्षा पुरी हिनं म्हटलं आहे की, ‘हे पाहून माझं रक्त खवळलं आहे. आंदोलनाच्या नावाखाली असं दूध वाया घालवणाऱ्यांना लाज वाटायला हवी. लाखो लोक भूकेमुळे मरत असताना हे पाहायला मिळत आहे. असं करणारे लोक मुर्ख आहेत,’ अशा शब्दांमध्ये आकांक्षाने आपला संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

लॉकडाऊनमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन;  प्रति किलो 20 रुपये दर मिळावा अशी मागणी

दुधातील भेसळ रोखण्यासाठी आता क्यूआर कोड – सुनिल केदार