राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती आहे – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर माजवला आहे. यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हा १ जून पर्यंत वाढवण्यात आला होता. आता रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी स्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे सरसकट लॉकडाऊन न हटवता निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता विविध मंत्र्यांनी वर्तवली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवता येणार नाही. १५ जूनपर्यंत निर्बंध आपण वाढवत आहोत. राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये स्थिती चिंताजनक असेल तिथे आणखी कडक निर्बंध लावले जातील, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, ज्या जिल्ह्यांमध्ये स्थिती आटोक्यात आली असेल तिथे टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जाईल असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, नव्या नियमांबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केल्यानंतर स्पष्टता होईल.

महत्वाच्या बातम्या –