आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहे. राज्यात कृषी विभागाची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे. पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध व्हायला हवी. तसेच शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते.

शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे कृषी सहायकाकडून केले जाते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता गावांमध्ये जावे. तेथे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या. त्यांनी फोटो काढण्यासाठी काम करू नये. आज कृषी विभागाच्या योजनांचा लाभ काही मोजकेच शेतकरी घेतात. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्या सोबत कसे जोडता येईल यावर त्यांनी काम करावे. आपल्याला हे सर्व चित्र कसे बदलता येईल आणि हे सर्व बदलणे आवश्यक आहे याचा त्यांनी विचार करावा.

हे सर्व बदलण्यासाठी कृषी सहायकांनी आठवड्यात किमान तीन दिवस गावात जायलाच हवे . कृषी विभागाचे कर्मचारी , सहकारी आमच्या गावात येऊन योजनांची माहिती देतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील कृषी अधिकाऱ्यांची आढावा बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी श्री. भुसे म्हणाले, की कृषी विभागाच्या योजनांचा फापट पसारा हा आपण कमी करणार आहोत. कामांची पुनर्बांधणी करण्यात येत असून कृषी विभागात चांगले काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या कृषीसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात टेबल खुर्ची मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –

फेब्रुवारीच्या अखेरीस कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा : दादा भुसे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये

साथीच्या आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य खात्याचे नवीन पाऊल

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी(