आजचा हवामान अंदाज: मुंबईत हवामान कोरडे ,महाराष्ट्रातील तापमानात वाढ होण्याची शक्यता

हवामान अंदाज

उत्तरेकडील भागात, पश्चिमी विक्षोभ लडाख व त्याच्या आसपासच्या भागात आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेशातील काही ठिकाणी आणि उत्तराखंडमधील एक दोन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. तसेच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

मध्य भारतात , महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागात विदर्भात चक्रवाती परिस्थिती आहे. त्यामुळे या भागांच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ शकते. तसेच पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणी एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान पूर्व भारतात कोरडे हवामान राहील. 

जाणून घ्या ग्रीन टीचे अनेक फायदे….

किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये एक किंवा दोन मध्यम सरींसह हलका पाऊस पडत राहील. बंगालच्या उपसागरापासून दमट वारे आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडूमध्ये ओलावा वाढवत राहतील. त्यामुळे तेलंगाणाच्या काही भागात एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

source – skymetweather

महत्वाच्या बातम्या –

शासकीय कार्यालयांसाठी सौरऊर्जेचा वापर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता तर मुंबईत हवामान उबदार राहील