नाफेडने यावर्षी देखील तूर खरेदी सुरु केली असून १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पहिल्या दिवशी सुमारे ९०० शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज सादर केले. यंदा नाफेडकडून तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव दिल्या जातोय. नोंदणीची प्रक्रिया १४ फेब्रुवारीपर्यंतच असल्यामुळे शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.
अतिवृष्टीमुळे मक्याची प्रतवारी घसरली
गेल्यावर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सुरू आहे, तर शासनाचा हमीभाव ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. नाफेड व खासगी तुरीला मिळणाऱ्या भावात सुमारे आठशे ते हजार रुपयांची तफावत असल्याने नाफेडकडे तूर विक्रीसाठी आणण्यास शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक
जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर लागवड झालीय. परिणामी उत्पादन देखील चांगलं येण्याची शक्यता पाहता नाफेडने यावर्षी प्रतिक्विंटलला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला. आतापर्यंत फक्त जालना तालुक्यात दीड हजारावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केलीय. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे तूर विक्रीसाठी शेतकरी पाठ दाखवतायत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त https://t.co/8VzbOSLJPU
— Krushi Nama (@krushinama) February 12, 2020