राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ भागांमध्ये उद्या मुसळधार पावासाची शक्यता

पाऊस

मुंबई –  राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर उद्या राज्यात दिवस मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रीय होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  गेले दोन दिवस राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण भागात चांगला पाऊस झाला. तर मुंबईत तुरळ पाऊस झाला आहे.

तर  22 नोव्हेंबरपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल शी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –