राज्यात ‘या’ भागात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

पाऊस

पुणे – परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून हळूहळू माघार घेत आहे. संपूर्ण राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागांतून ६ ऑक्टोबरला मान्सून माघार घेणार असल्याचे शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे.

येत्या ९ ऑक्टोबरच्या दरम्यान बंगाल उपसागराच्या परिसरात आणि उत्तर अंदमान परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. यामुळे परतीचा मान्सून वेगाने माघार घेण्याची शक्यता असून त्यासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती अनेक भागात आहे.

शनिवारी (३ ऑक्टोबरला) राजस्थानचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या  काही भागातून मान्सूनने आपला मुक्काम हलवला आहे. यामुळे पावसाची उघडीप असून वाऱ्यांची दिशा, हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे.

सध्या अरबीसमुद्राच्या पूर्वमध्य भाग व दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी परिसरात चक्राकारस्थिती आहे. तर बंगालच्या उपसागर व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे
चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून परतीच्या पावसाला परतण्यासाठी वेगाने सरकण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील हवामानात वेगाने बदल होत आहेत. तर उत्तर भारतात पावसाची उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान खात्यानेसांगितले.

महत्वाच्या बातम्या –